
सोशल मीडियावर सध्या एका कोंबडीची जोरदार चर्चा असून तिच्या चर्चेचे कारण म्हणजे तिचे आयुष्य ठरलेले आहे. प्रत्येक प्राण्याला आणि पक्षाला एक आयुष्य असते मात्र अनेकदा चांगला पोषक आहार मिळाल्यानंतर त्यांच्या आयुर्मानात देखील माणसांप्रमाणेच बदल होतात. ही कोंबडी देखील यामुळे चर्चेत आलेली असून तब्बल वीस वर्षांपासून जास्त ही कोंबडी जगलेली आहे. कोंबडी जगण्याची सर्वसाधारण मर्यादा चार ते पाच वर्षे असते त्यामुळे ही कोंबडी चर्चेत आलेली आहे गिनीज बुकमध्ये तिचे नाव नोंदवण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अमेरिकेतील ही कोंबडी असून तिचे नाव पीनट असे आहे तर तिच्या मालकाचे नाव डार्विन असे आहे. नुकताच आपला पिनट या कोंबडीने नुकताच आपला एकविसावा वाढदिवस साजरा केलेला असून आता तिने 22 व्या वर्षात पदार्पण केलेले आहे.
कोंबडीच्या मालकाच्या म्हणण्याप्रमाणे तिचे वय इतके वाढून देखील ती आत्तापर्यंत तंदुरुस्त आहे. दररोज सकाळी ती ब्लूबेरी योगर्ट खाते त्यामुळे तिची प्रकृती ठणठणीत राहिलेली आहे. सध्या ती अत्यंत श्रीमंत थाटात जगत असून आपल्या कोंबडीचे नाव गिनीज बुकमध्ये गेल्यानंतर तिच्या मालकांनी तिची अजून काळजी घेण्यास सुरुवात केलेली आहे.