गर्भवती महिलेच्या पोटावर लाथा मारल्याने नको ते घडलं , वाघोलीतील घटना

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून तीन व्यक्तींनी एका गर्भवती महिलेला बेदम मारहाण केलेली आहे . तरुणीच्या पोटावर मारहाण केल्याने तिच्या पोटात रक्तस्राव होऊन अखेर तिचा गर्भपात झालेला असून आरोपी व्यक्तींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , रवी धोत्रे , शांताबाई धोत्रे सोबतच दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून वाघोलीतील गोरे वस्ती परिसरात ही घटना घडलेली आहे. आरोपींच्या विरोधात एका 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिलेली आहे.

वाघोली येथील गोरे वस्ती परिसरात सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून रवी आणि शांताबाई धोत्रे यांनी पीडित तरुणीला शिवीगाळ केली त्यानंतर अल्पवयीन मुलाने तिच्या पोटावर मारहाण केली म्हणून रक्तस्राव होऊ लागल्याने तिला त्वरित ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते त्यावेळी तिचा गर्भपात झालेला आहे.


शेअर करा