शाब्बास ताई..आईवडिलांचं नाव काढलं , एसटी प्रवर्गात राज्यात प्रथम

शेअर करा

आपली मुले पोलीस व्हावीत असे बहुतांश पोलीस बांधवांनाच वाटत नाही मात्र या कल्पनेला तडा देणारी एक घटना नागपूर इथे समोर आलेली असून कोतवाली पोलीस ठाण्याचे दिलीप उईके यांची मुलगी असलेली निकिता हिने स्पर्धा परीक्षेत दमदार यश मिळवत अखेर पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान मिळवलेला आहे . सर्वच थरातून निकिता हिचे जोरदार कौतुक करण्यात येत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश मिळवलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून एम एस सी झालेली निकिता हिने पदवी शिक्षण घेत असतानाच एमपीएससीमधून यश मिळवण्याचे स्वप्न ध्येय ठेवलेले होते. 2022 मध्ये लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतील राज्यात अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात महिलांमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.

निकिता हिचे वडील पोलीस दलात असल्याने आई ललिता यांच्या आग्रहास्तव मुलीचे चांगले करिअर घडावे म्हणून इयत्ता पाचवीमध्ये त्यांना तिला जवाहर नवोदय विद्यालयात टाकण्यात आलेले होते. बारावी मध्ये एकूण 90% गुण मिळवल्यानंतर निकिता हिने नागपूर येथील एका कॉलेजमधून बीएससी पास केले आणि त्यानंतर एम एस सी मध्ये देखील उत्तम मार्कांनी तिने यश मिळवले. शिक्षक असलेले विक्रम आकरे यांच्या मार्गदर्शनात तिने स्पर्धा परीक्षेचे हे यश प्राप्त केलेले आहे. आपल्या यशामध्ये आई-वडिलांचा मोठा सहभाग आहे असे देखील तिने म्हटलेले आहे.


शेअर करा