तब्बल सहा महिन्यापासून पुण्यातून महिला गायब , पोलिसांकडून प्रसिद्धीचे आवाहन

शेअर करा

पुणे शहरातून खराडी परिसरातून एक महिला गायब झाल्याचे प्रकरण सध्या समोर आलेले असून महिलेच्या पतीने याप्रकरणी चंदननगर पोलिसात खबर दिलेली आहे. सदर दांपत्य ही मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून कामानिमित्त म्हणून पुण्यात राहत होते. सदर महिला ही तब्बल सहा महिन्यापासून गायब आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पूजा गणेश मुळे ( वय 21 वर्ष ) असे गायब झालेल्या महिलेचे नाव असून त्यांनी गुलाबी रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाऊज अशी वेशभूषा घटना घडली त्या दिवशी परिधान केलेली होती. त्यांची उंची सुमारे पाच फूट असून गळ्यात सोन्याचे मनी मंगळसूत्र आणि एक नोकिया कंपनीचा मोबाईल आहे. इयत्ता नववीपर्यंत त्यांचे शिक्षण झालेले असून बारा मार्च रोजी धुणी भांडी कामाकरता त्या घराबाहेर गेलेल्या होत्या मात्र त्या पुन्हा आल्या नाहीत.

महिलेचे पती गणेश अशोक मुळे ( वय 30 वर्ष राहणार खराडी कामधंदा सिक्युरिटी गार्ड ) यांनी याप्रकरणी चंदननगर पोलिसात खबर दिलेली असून १२ मार्च २०२३ रोजी सकाळी आठच्या सुमारास त्या कामावर गेलेल्या होत्या . महिला ज्या ठिकाणी कामावर गेलेल्या होत्या त्या गंगा लिवेनो सोसायटी खराडी येथे जाऊन पतीने चौकशी केली मात्र त्यावेळी त्या तिथे आल्या नाही अशी माहिती समजली . इतर नातेवाईकांकडे देखील त्यांनी चौकशी केली मात्र त्या मिळून आल्या नाहीत म्हणून अखेर चंदननगर पोलिसात या प्रकरणी त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी फिर्याद दिलेली होती मात्र अजूनही त्या आढळून आलेल्या नाहीत.


शेअर करा